अनखोडा येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा
अनखोडा ता. चामोर्शी, जि. गडचिरोली येथील वक्रतुंड महादेव मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने आयोजित जय बजरंगबली, शिवपिंड व पंचमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला.
या पवित्र सोहळ्यास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली.
यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना ब्राम्हणवाडे यांनी धार्मिक परंपरा जपण्याचे महत्त्व सांगत समाजात एकोपा, सद्भावना व सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.
या सोहळ्यास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रवचनकार संत मुर्लीधर महाराज,जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग राजेश ठाकूर, निकेश गद्देवार,प्रेमानंद गोंगले, गौरव येणप्रेड्डीवार, विनोद येलमुले, अशोक चहारे, दिलीप कुरवटकर, संजय चौधरी, लक्ष्मण पोटे, संदीप झाडे परिसरातील शेकडो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

