अवैध दारू तस्करी चे वाहन पकडताय परंतू ती येते कुढूण याचा शोध तरी घेताय का? जनतेचा प्रश्न

0

अवैध दारू तस्करी चे वाहन पकडताय परंतू ती येते कुढूण याचा शोध तरी घेताय का? जनतेचा प्रश्न 

 अहेरीत पोलिसांची मोठी कारवाई! ७ लाखांचा दारूसाठा जप्त


अहेरी (गडचिरोली), दि. १ एप्रिल २०२६ :
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अवैध दारू माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र अवैध दारू तस्करी चे वाहन पकडताय परंतू ती दारु येते कुठून याचा कधी शोध घेतला काय असा प्रश्न विचारला जात आहे 
दि. ३१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० ते ५.४५ वाजताच्या दरम्यान अहेरी पोलीसांचे पथक नियमित गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे मोजा इंदाराम जंगल परिसर, आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील पुलाजवळ संशयित वाहनावर नजर ठेवण्यात आली.
पोलीसांनी वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने चकवा देत वाहन जंगलाच्या दिशेने नेले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला.
यानंतर पंचांसमक्ष वाहनाची तपासणी करण्यात आली असता, पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो (क्र. एमएच ४० सीए १७७२) या वाहनात मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला.
यामध्ये ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या ९० मिली मापाच्या तब्बल ४३ खोक्यांमध्ये ४३०० सीलबंद बाटल्या सापडल्या. जप्त दारूची किंमत सुमारे ३ लाख ४४ हजार रुपये असून वाहनाची किंमत ४ लाख रुपये आहे. अशा प्रकारे एकूण ७ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी दादाराव चिन्नू सिडाम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) अंतर्गत गुन्हा क्रमांक १०२/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद महिला पोलीस नाईक मनिषा मुलकावार यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चैतन्य घावटे करीत आहेत. या कारवाईस प्रभारी पोलीस निरीक्षक हर्षल व्ही. ऐकरे यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, अहेरी परिसरात अवैध दारू वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी आक्रमक मोहीम सुरू केली असून अशा सातत्यपूर्ण कारवायांमुळे बेकायदेशीर धंद्यांवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !