दुसऱ्या पतीने रचले पत्नीला संपविण्याचा कारस्थान, ठार करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने केले वार

0
दुसऱ्या पतीने रचले पत्नीला संपविण्याचा कारस्थान,  ठार करण्याच्या उद्देशाने धारदार  शस्त्राने केले वार



आष्टी (अशोक खंडारे):-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर येथे आपल्या पत्नीला  पैशांच्या कारणावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला करून ठार मारण्यासाठी धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  या घटनेची माहिती मिळताच आष्टी  पोलिसांनी तत्काळ वेळ न दवडता  तपासाची चक्रे फिरवून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मंजुरिका निशी सरदार (वय 38), रा. दुर्गापूर, ता. चामोर्शी या दि. 28 मे 2026 रोजी रात्री सुमारे 1 वाजताच्या सुमारास आपल्या घराजवळील संडासकडे जात असताना त्यांचा दुसरा पती रणजित सुनिल मंडल (वय 40), रा. बसंतीनगर-07, नज्जरूलनगर, जिल्हा कुमरामभीम, तेलंगणा हा अचानक समोर आला.
यावेळी आरोपीने “तु मला पैसे दे, पैसे नाही दिलेस तर तुला ठार मारून टाकीन” अशी धमकी देत फिर्यादीस शिवीगाळ केली. त्यानंतर तिचे केस ओढून मारहाण केली व धारदार शस्त्राने मानेवर, खांद्यावर आणि पाठीवर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
घटनेनंतर जखमी महिलेला ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात घेतलेल्या जबाबावरून आष्टी पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. 148/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे या़च्या मार्गदर्शनाखाली सपोनि किरण भालेकर व पोलीस करीत आहेत
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !