गांजाची सवय लयी भारी ! मीत्रानेच केली मीत्राची यमसदनी वारी!!
गडचिरोली जिल्ह्यातील गुरवळा जंगलातील थरार
गडचिरोली :-
गडचिरोली जिल्ह्यातील गुरवळा जंगल परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. गांजा ओढायला जाऊ म्हणून जंगलात गेले व तिथेच संपला मित्राचा खेळ अशी घटना एकाच शाळेत शिकणाऱ्या दोन मित्रांमध्ये घडली आणि किरकोळ वाद झाला आणि त्याचे रूप थेट खुनात बदलले. आरोपी अल्पवयीन मुलाने आपल्या मित्राचा निर्घृणपणे खून करून पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटी कहाणी रचल्याचे तपासात उघडकीस आलेले आहे.
मृत मुलाचे नाव बादल नकटू कोसमकर (वय १७, रा. डोंगरगाव बु.) असे असून आरोपी त्याचाच जवळचा मित्र असल्याचे सांगितले जात आहे. बहिणीबद्दल अपशब्द; रागातून घेतला जीव
माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी आणि बादल यांच्यात वाद झाला होता. या वादावेळी बादलने आरोपीच्या बहिणीबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. याच रागातून आरोपीने सूड उगवण्याचा कट रचला.
२७ मे रोजी आरोपीने बादलला “गांजा ओढायला जाऊया” असे सांगून विश्वासात घेत गुरवळा जंगलाकडे नेले. जंगलात दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि संतापलेल्या आरोपीने लोखंडी रॉडने बादलच्या डोक्यावर जबर मारहाण केली. त्यानंतर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्याचा जागीच खून केला.
पोलिसांसमोर रचली खोटी कहाणी
खून केल्यानंतर आरोपी घाबरला आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी थेट पोलिस ठाण्यात पोहोचला. पोलिसांना त्याने सांगितले की, “मी आणि बादल जंगलात गेलो असताना काही अज्ञात लोकांनी बादलवर हल्ला केला.”
मात्र चौकशीदरम्यान आरोपीच्या जबाबात वारंवार विसंगती आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांना संशय आला.
📱 मोबाईल चॅटिंगमुळे उघडकीस आला कट
पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल कॉल डिटेल्स, चॅटिंग आणि घटनास्थळाची तपासणी करण्यात आली. तांत्रिक पुरावे आणि कठोर चौकशीनंतर आरोपीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे

