मंगळवेढ्याचे तहसिलदार मदन जाधव यांना बडतर्फ करण्याची मागणी

0
मंगळवेढ्याचे तहसिलदार मदन जाधव यांना बडतर्फ करण्याची मागणी


मंगळवेढा -: शासनाचे प्रचलित कायदे व नियमातील तरतुदींचे उल्लंघन करून मनमानी पद्धतीने रस्ता केसचा निकाल देणारे मंगळवेढ्याचे तहसिलदार मदन जाधव यांना तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी दलीत अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी.के. साखरे यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महसूल सचिव, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सोलापूर व उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
     याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मौजा डोंगरगांव येथील गट नंबर ७६/२ब या शेतजमिनी करिता सर्व्हे नंबर १७ व १८ च्या हद्दिवरील बांधावरून तसेच गट नंबर ७३,७७/३ व ७६/१ च्या हद्दीवरून पूर्व पश्चिम चालीचा ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडीचा रस्ताची मागणी सौ श्रीदेवी साखरे यांनी शेती प्रयोजनार्थ केली होती. सदर रस्ता केसमधील स्थळ पाहणी अहवाल लिहीत असताना जाधव यांनी जाणीवपूर्वक व खोडसाळपणे वस्तूस्थिती लिहिली नाही याउलट निकाल पत्रात मोघम स्वरूपाचे,खोटे व प्रतिवादी क्रमांक १ यांच्या प्रेमापोटी निष्कर्ष नोंदविले आहेत.
        महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४३ चे व शासनाचे अन्य प्रचलित कायदे व नियमांचे तरतुदींचे जाधव यांनी जाणीवपूर्वक व खोडसाळपणे उल्लंघन केले असल्याचे साखरे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या रस्ता केसचा निकाल देत असताना जाधव यांनी मनमानी केली असून वस्तुस्थिती लपवून, खोटे निष्कर्ष नोंदवून मनमानी पद्धतीने निकाल देऊन अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले असून प्रशासनाचे व न्यायालयाचे दरवाजे ठोठावयाला भाग पाडले आहे. त्यामुळे तहसिलदार मदन जाधव यांची खातेनिहाय सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ बडतर्फ करा अशी मागणी साखरे यांनी केली आहे .
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !