अपघातग्रस्त तरुणाला आजाद समाज पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्षांची जीवनदायी मदत

0
अपघातग्रस्त तरुणाला आजाद समाज पार्टीच्या युवा जिल्हाध्यक्षांची जीवनदायी मदत

चंद्रपूर–गडचिरोली मार्गावर अपघातग्रस्त युवकाला तातडीने रुग्णालयात दाखल करून मानवतेचे घडविले दर्शन 


गडचिरोली (अशोक खंडारे) :- चंद्रपूर–गडचिरोली मार्गावरील  व्याहाड गावाजवळ एक तरुण दुचाकी अपघातात गंभीर जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडला होता चंद्रपूर कडून आजाद समाज पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे येत असतांना त्यांना एक ईसम अपघातग्रस्थ नजरेस पडला तेव्हा त्यांनी तत्परता दाखवत त्याच्या मदतीसाठी धाव घेतली. 
गंभीर अपघातग्रस्त युवकाला तात्काळ उचलून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी विवेक खोब्रागडे यांच्यासोबत असलेल्या महिंद्रा फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकांनीही मदतीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

प्राथमिक माहितीनुसार, जखमी युवक हा नवेगाव मुरखळा येथील रहिवासी असल्याचे समजले आहे. मात्र, त्याचे नाव आणि इतर माहिती तत्काळ उपलब्ध होऊ शकली नाही. एखाद्या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरून पळ काढल्याची शक्यता विवेक खोब्रागडे यांनी व्यक्त केली आहे.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू करण्याऐवजी प्रशासनाकडून चौकशी करण्यात येत असल्याचे पाहून विवेक खोब्रागडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. "आधी उपचार करा, चौकशी नंतरही करता येईल" अशी ठाम भूमिका घेत त्यांनी रुग्णालय प्रशासनाला ताकीद दिली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर जखमी युवकावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.

या संपूर्ण घटनेत विवेक खोब्रागडे यांनी दाखविलेली तत्परता, मानवता आणि सामाजिक जबाबदारी याबद्दल नागरिकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. अपघातग्रस्त व्यक्तीला वेळेवर मदत मिळाल्यास जीव वाचू शकतो, याचे हे जिवंत उदाहरण असल्याची प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !