पोटच्या नवजात मुलीची जन्मदात्या आईनेच गळा आवळून केली हत्या

0
 पोटच्या नवजात मुलीची जन्मदात्या आईनेच गळा आवळून केली हत्या


पालघर :-
 १5 सप्टेंबर: पालघर जवळील घिवली गावात मातृत्वाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिसरी मुलगी झाली म्हणून एका निर्दयी मातेने आपल्या पाच दिवसांच्या चिमुकलीचा गळा आवळून हत्या केली, तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी या निर्दयी मातेने चिमुकलीचा मृतदेह नदीत फेकून दिला आहे. याप्रकरणी तारापूर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने तिची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.

घिवली गावात राहणाऱ्या श्रेया प्रभू या ३२ वर्षीय महिलेला पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा असल्याने तिला तिसऱ्यांदाही मुलाचीच अपेक्षा होती. मात्र तिसऱ्यांदा पुन्हा मुलगी झाली. ही मुलगी नको म्हणून या निर्दयी महिलेने रात्री ११.३० वाजताच्या सुमारास सहा दिवसांच्या नवजात चिमुकलीचा स्वतःच्या हाताने गळा दाबून खून केला. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह एका प्लास्टिक पिशवी आणि पिवळ्या कुर्त्यात गुंडाळून शाळेच्या बॅगेत भरून तो फेकण्यासाठी सकाळी एसटीने बोईसर रेल्वे स्टेशन आणि तिथून बोईसर ते खार मुंबई येथे माहेरी गेली. परंतु खार येथील घरी कोणीच नसल्याने आणि मृत बाळाला फेकण्यासाठी योग्य ठिकाण न मिळाल्याने पुन्हा बोईसरला
परत आली. सायंकाळी चारच्या सुमारास वानगाव परिसरातील नदीपात्रात तिने बाळाचा मृतदेह फेकला आणि घर गाठले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !