नव्या इमारतीला लागले ग्रहण अंगणवाडीची जिर्ण इमारत असतानांही लसिकरण मात्र तिथेच

0

नव्या इमारतीला लागले ग्रहण अंगणवाडीची जिर्ण इमारत असतानांही लसिकरण मात्र तिथेच 


आष्टीतील अंगणवाडी क्र. २ धोक्याच्या छायेत; रखडलेल्या नव्या इमारतीमुळे बालकांचा जीव टांगणीला

 दोन-तीन वर्षांपासून नवीन इमारतीचे बांधकाम रखडले, पालकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी


आष्टी (अशोक खंडारे):-
आष्टी येथील अंगणवाडी क्रमांक २ ची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून ती जीर्ण झालेल्या अवस्थेत आहे धोकादायक इमारतीतच लहान बालकांचे लसीकरण व अंगणवाडीचे कामकाज सुरू असल्याने पालकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
या अंगणवाडीत परिसरातील मोठ्या संख्येने बालके नियमितपणे येतात. आरोग्य विभागाकडून येथे लसीकरणाची मोहीमही राबविली जाते. मात्र, इमारतीची दुरवस्था पाहता कोणतीही क्षणी दुर्घटना घढू शकते कारण की, आता ऐन पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत कोणत्याही दिवशी इमारत कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे पालक चिंता व्यक्त करीत आहेत.
विशेष म्हणजे, अंगणवाडीसाठी नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे काम अपूर्ण अवस्थेतच रखडले आहे. त्यामुळे बालकांना आजही जुन्याच आणि असुरक्षित इमारतीत यावे लागत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, एखादी अनुचित घटना घडल्यानंतर हालचाल करण्यापेक्षा प्रशासनाने आताच ठोस निर्णय घेऊन रखडलेले बांधकाम पूर्ण करावे. बालकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व आवश्यक सुविधांनी युक्त नवीन अंगणवाडी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी मागणी केली आहे 
यासंदर्भात संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन नवीन इमारतीचे उर्वरित बांधकाम पूर्ण करावे आणि अंगणवाडीतील बालकांच्या सेवेत लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अंगणवाडी केंद्र क्र २ आष्टी येथील पालकांनी आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !