शुल्लकच्या वादातून मुलाने संपविले जन्मदात्याचे जीवन

0
शुल्लकच्या वादातून मुलाने संपविले जन्मदात्याचे जीवन 




लगाम चेक येथील घटना 

आष्टी:-

घरगुती शुल्लकच्या वादातून मुलाने स्वतःच्या जन्मदात्यावर काठीने प्रहार करून त्यांचे पूढील आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील लगाम चेक येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी मुलाला तात्काळ ताब्यात घेतले आहे.

मृत व्यक्तीचे नाव नारायण आशा टेकाम वय ६१ असे असून आरोपी मुलगा विजय नारायण टेकाम वय ४० यानेच हा हल्ला केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ जूनच्या रात्री घरगुती कारणावरून बाप-लेकामध्ये वाद झाला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या विजयने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने नारायण टेकाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले व आरोपीला ताब्यात घेतले व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला 
घटनेनंतर विजयने गावकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी वडील खाली पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, साक्षीदारांचे जबाब आणि प्राथमिक तपासातून संशयिताची कसून चौकशी केली असता त्याचा खोटेपणा उघड झाला. अखेर विजयने गुन्ह्याची कबुली दिली.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाप-लेकामध्ये यापूर्वीही अनेकदा वाद होत असत. नारायण टेकाम यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. विवाहित मुलगी सासरी राहत असून दोन मुलांसह ते लगाम चेक येथे राहत होते. धाकटा मुलगा कामानिमित्त भामरागड तालुक्यात गेला असल्याने घटनेच्या वेळी घरात नारायण आणि विजय हे दोघेच उपस्थित होते.

या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नातेसंबंधातील वाढती दुरावस्था आणि मद्यपानामुळे उद्भवणाऱ्या गंभीर घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.


Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !