आष्टी येथे अनाथ बालकांसोबत साजरा केला शिवसेना सचिव संजय मोरे यांचा वाढदिवस
आष्टी (अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९:-
शिवसेना सचिव तथा ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथील अनाथ आश्रमातील बालकांना अन्नधान्य व बिस्कीटचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांच्या पुढाकाराने पार पाडण्यात आला.
वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा देण्यापुरते मर्यादित न राहता समाजातील गरजू आणि वंचित घटकांसोबत आनंद साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. अनाथ आश्रमातील बालकांना जीवनावश्यक अन्नधान्य तसेच बिस्कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी बालकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि समाधान पाहून उपस्थितांचे मन भारावून गेले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, डॅनियल सर, ग्रामपंचायत सदस्य कपिल पाल, संतोष बारापात्रे, शिवसेना नेते गुड्ड भाऊ आचेवार, अंतू भाऊ तांगडे, आशिष क्षिरसागर, शुभम औतकर, अजय कारेवार, मुन्ना हलधर, अक्षय तीमाडे करण येलमुले विनीत कलाक्षपवार देविदास ठाकूर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थितांनी सांगितले की, संजय मोरे यांच्या कार्यपद्धतीतून प्रेरणा घेत समाजाभिमुख उपक्रम राबविणे हीच त्यांना खरी वाढदिवसाची भेट आहे. पुढील काळातही अशा सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सामाजिक उपक्रमामुळे वाढदिवस साजरा करण्याला एक वेगळी आणि अर्थपूर्ण दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

