मृतक भारत निमरूड यांच्या कुटुंबियांना विमा रकमेचा धनादेश प्रदान
संस्थेच्या सहकार्याने वारस पत्नीस आर्थिक मदत; पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित
आष्टी, (अशोक खंडारे):-
शासकीय वन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित आलापल्ली येथील सभासद भारत भाऊजी निमरूड यांचे २७ मे २०२५ रोजी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संस्थेच्या वतीने विमा दाव्याची प्रक्रिया पूर्ण करून वारस पत्नी करुणा निमरूड यांना विमा रकमेचा धनादेश २१ फेब्रुवारी रोजी प्रदान करण्यात आला.
भारत निमरूड यांनी संस्थेकडून दीर्घमुदती कर्ज व आकस्मिक कर्ज घेतले होते. संबंधित कर्जासाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत अपघाती विमा काढण्यात आला होता. विमा रकमेतील कर्ज कपात करून उर्वरित रक्कम वारसांना देण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष आर. एस. मडावी, उपाध्यक्ष एन. आर. सिडाम, सचिव प्रदीप केदवलवार, संचालक वरसल पठाण, नितेश कुमरे, आकाश शेरकी, पृथ्वीराज गेडाम, शोभा झोडे तसेच संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
संस्थेच्या या उपक्रमामुळे मृतकाच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

