शेतकऱ्यांना आवश्यक कृषी साहित्याचा तातडीने पुरवठा करा - गडचिरोली कांग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे

0

शेतकऱ्यांना आवश्यक कृषी साहित्याचा तातडीने पुरवठा करा - गडचिरोली कांग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे



गडचिरोली (अशोक खंडारे):-
गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरवळकर यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध कृषी समस्यांवर सविस्तर चर्चा केली.
 खरीप हंगामासाठी आवश्यक असलेली खते, कीटकनाशके तसेच इतर सर्व कृषी साहित्याचा पुरेसा व सुरळीत पुरवठा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली कोणत्याही शेतकऱ्याला कृषी साहित्याअभावी अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करून तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष किंवा दिरंगाई झाल्यास गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तीव्र आंदोलन करेल असा कडक इशारा जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांनी दिला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव पंकज गुड्डेवार, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विवेक घोंगडे, हेमंत मोहितकर आणि विलास ठाकरे उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !