सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती आष्टी तर्फे शिवजयंती थाटामाटात साजरी
आष्टी (अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९):-
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती आष्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिनांक 18 फेब्रुवारी 2026 व 19 फेब्रुवारी 2026 रोजी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती उत्सवाला आष्टी वासियांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. राकेशभाऊ बेलसरे (शिवसेना जिल्हाप्रमुख), सहउद्घाटक सौ. रेश्माताई फुलझेले (उपसरपंच ग्रा.पं. आष्टी), कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. परागभाऊ गोणपल्लीवार, डॉ. रवीभाऊ बुर्लावर तसेच प्रमुख पाहुणे मा. दिलीप बारसागडे (केंद्रप्रमुख आष्टी), मा. सुरजभाऊ कुकुडकर (त.मु.स.अध्यक्ष आष्टी), ग्रा प.सदस्य. कपिलभाऊ पाल, मा. संतोषभाऊ बारापात्रे, मा. आनंदराव खरबनकर, मा. सुधीर फरकडे, मा. संदीप जोरगलवार, मा.सालुरकर सर, मा. संजय भोयर सर, मा. राजकुमार वैद्य, मा. रुपेश बुरमवार सर, मा. राजुभाऊ तुमडे, मा.अमोलभाऊ पंदिलवार, मा. आनंदभाऊ कांबळे, मा. सचिनभाऊ डहाळे, मा. गोलुभाऊ पोटवार, मा. लताताई पोरटे, मा. विद्याताई जुनघरे, मा. पुनमताई बावणे , मा. लाजवंती औतकार, मा. वैशालीताई आंबटकर, मा. विनोद दुर्गे, मा. गणेशभाऊ शिंगाडे, मा. मंगेशभाऊ पोरटे इ. मान्यवर उपस्थित होते.
तसेच 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून कठोर परिश्रमाने पोलिस व इतर सेवेत रुजू झालेल्यांचा व विवीध क्रिडाप्रकारात राष्ट्रीय व राज्य पातळीवर सुवर्ण व कास्य पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंचा शाल, श्रीफळ व गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. व शिवगीतावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला यावेळी गाव जेवणाची व्यवस्था करण्यात आली.19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करीत छत्रपती शिवाजी चौक ते हनुमान मंदीर, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गाने रॅली काढण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माला अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य शिव शोभायात्रा संपन्न करण्यात आली.यात महीला, पुरूष, लहान बालगोपाळ यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सार्वजानिक शिवजन्मोत्सव समिती आष्टी चे पदाधिकारी, समस्त आष्टी व्यापारी संघटना, कार्यकर्ते, आष्टी पोलिस प्रशासक, यांचे उत्तम सहकार्य लाभले. शिवजन्मोत्सव कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे ज्यांनी हातभार लावला. या कार्यक्रमाचे आयोजक समितीचे अध्यक्ष विनीत कलाक्षपवार, उपाध्यक्ष करण येलमुले, सचिव आशिष क्षिरसागर, कोषाध्यक्ष सुमित कुकुडकर, सहसचिव गणेश चौधरी, आणि संपुर्ण सदस्य गण उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. डी. रॉय तर आभार सालुरकर यांनी केले

