अडपल्ली चेक (मलेझरी) येथे आष्टी पोलिस व कृषी अधिकारी यांनी ७ .२० लाखांचे प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे केले जप्त; वाहन चालक गजाआड

0
अडपल्ली  चेक (मलेझरी) येथे आष्टी पोलिस व कृषी अधिकारी यांनी ७ .२० लाखांचे प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे  केले जप्त;  वाहन चालक गजाआड




आष्टी, दि. 13 जून : आष्टी पोलिसांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित व अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाड टाकून तब्बल 7 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत वाहन चालकास अटक करण्यात आली असून जिल्ह्यातील अवैध बियाणा माफियांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आष्टी पोलीस स्टेशनचे पथक, कृषी विभागाचे अधिकारी व पंच यांनी मौजा अडपल्ली चक (मलेझरी) येथील शिवाजी चौक परिसरात सापळा रचला होता. यावेळी बामनपेठकडून येणारे टाटा पंच वाहन (क्र. AP-40-KR-7566) संशयास्पदरीत्या येताना दिसले. वाहन थांबवून पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये दोन प्लास्टिक चुंगळ्यांमध्ये भरलेले 60 किलो प्रतिबंधित HTBT कापूस बियाणे आढळून आले.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करून गौरव भगवान बिटपल्लीवार (वय 24, रा. मार्कंडा (कं.), ता. चामोर्शी, जि. गडचिरोली) यास ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांची अंदाजे किंमत 1 लाख 20 हजार रुपये असून वाहनाची किंमत 6 लाख रुपये असल्याने एकूण 7 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संजय ग्यानिराम मेश्राम यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 167/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023, बियाणे नियम 1968, बियाणे अधिनियम 1966 तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 मधील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद पोलीस हवालदार/2524 मो. जमील शेख यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल प्र. काळे, पोलीस स्टेशन आष्टी हे करीत आहेत.
जिल्ह्यात प्रतिबंधित व अनधिकृत बियाण्यांच्या विक्री व वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

सदर माल कुनाचा आहे याचासुद्धा शोध सुरू आहे 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !