नागपूर येथे विदर्भ निर्माण जनसकंल्प लॉंग मार्च तथा मेळाव्याचे आयोजन

0
नागपूर येथे विदर्भ निर्माण जनसकंल्प लॉंग मार्च तथा मेळाव्याचे आयोजन 


गडचिरोली:-
 विदर्भ निर्माण जनसंकल्प लॉंग मार्च व मेळावा
 शहीद चौक नागपूर ते चिटनीस पार्क नागपूर दिनांक 22 फेब्रुवारी 2026 ला 
 अखंड महाराष्ट्रात राहून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नाहीत, बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण होणार नाही, बालकांचे कुपोषण आणि गरोदर मातांची हेडसाळ थांबणार नाही, विदर्भाचा औद्योगिक विकास होणार नाही, वैद्यकीय शिक्षण तंत्रशिक्षण यात सुधारणा होणार नाही , सिंचनाचा रस्त्याचा अनुशेष भरून निघणार नाही. कर्जबाजारी महाराष्ट्रात विदर्भाचा विकास अशक्य आहे. याकरिता विदर्भातील जनतेचे स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एक उपाय आहे या एकाच विचाराने विदर्भ राज्य आंदोलन समिती मागील पंधरा वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती याकरिता सातत्याने आंदोलन करीत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती याकरिता पुन्हा एक आंदोलन *विदर्भ निर्माण जन संकल्प लॉंग मार्च व मेळावा* रविवार दिनांक 22 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता शहीद चौक नागपूर येथून लॉन्ग मार्च निघून दुपारी 2 वाजता चिटणीस पार्क नागपूर येथे विदर्भवाद्यांचा मेळावा संपन्न होत आहे. या लॉंग मार्च व मेळाव्यात विदर्भवादी जनतेने सहकाऱ्यासह जास्तीत जास्त संख्येने उपस्थित असावे असे आवाहन जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र सिंह ठाकुर, अशोक पोरेड्डीवार, जिल्हा उपाध्यक्ष घिसु पाटील , शालिक नाकाडे, रमेश उप्पलवार, पांडुरंग घोटेकर, चंद्रकांत शिवणकर, पांडुरंग नागापुरे, प्रकाश ताकसांडे, गुरुदेव भोपये, वेणुदास वाघरे,महिला अध्यक्ष अमिता मडावी, सुनिता मडावी यांनी एका पत्रकातून केलेआहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !