६४ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत नवोदिताचे नाट्य कलावंत सन्मानित
चंद्रपूर:
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजित 64 व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव विभागीय पारितोषिक वितरण समारंभ वसंतराव नाईक सभागृह वनामती नागपूर येथे नुकताच संपन्न झाला. 64 व्या मराठी राज्य नाट्य स्पर्धेत चंद्रपूर येथील नवोदिताने सादर केलेल्या तांडा या नाटकास निर्मितीसह इतर आठ पुरस्कार प्राप्त झाल्याने नवोदिताच्या कलाकारांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. राज्य नाट्य स्पर्धेत निर्मिती प्रथम नवोदिता चंद्रपूर, दिग्दर्शन प्रथम प्रशांत कक्कड ,प्रकाशयोजना प्रथम मिथुन मित्र, रंगभूषा प्रथम ज्योती करणुके, वेशभूषा प्रथम मुग्धा कक्कड -खत्री , संगीत दिग्दर्शन प्रथम वैभव पाराशर ,उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक प्रशांतजी कक्कड आणि कल्याणी बोरकर आदी पारितोषिक विजेत्या कलाकारांना रोख रक्कम,,मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत नवोदिता चंद्रपूर प्रस्तुत निनाद नितीन पाठक लिखित प्रशांत कक्कड दिग्दर्शित " तांडा " या दोन अंकी नाटकास चंद्रपूर विभागीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.जात पंचायत , अत्यंत जाचक शिक्षा सुनावल्यामुळे कुटुंबाची होणारी असहायता,हतबलता, अगतिकता नाटकातून दर्शविले आहे. अनिष्ट प्रथा जोपासणाऱ्या जात पंचायतीविरूद्ध विद्रोह दर्शविणारे नवोदिताचे ' तांडा ' हे नाटक एका गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यात करण्यात यशस्वी ठरले.
सदर पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी
रंगकर्मी किशोर आयलवार, मोहनजी पांडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिनजी शेंडे, श्री.गायधनी, श्री.कोवे , मंजू लोखंडे आदी मान्यवर व तांडा टीमचे कलावंत शंकर लोडे , प्रा.रोशन गजभिये ,प्रा. राजकुमार मुसने, शिरीष आंबेकर, गौरव भट्टी, वैभव पराशर,प्रा.स्नेहल राऊत, कल्याणी बोरकर गौरी राऊत उपस्थित होते. तांडा नाट्यप्रयोगात प्रशांतजी कक्कड,शंकर लोडे, शिरीष आंबेकर, प्रा.राजकुमार मुसणे,विलास मांडवकर,प्रा.प्रकाश लालसरे, सागर, गौरव भट्टी, प्रा.रोशन गजभिये, नरेश बोरीकर, भिष्मा, बल्ली सिंग, चेतन, गणेश अतकर, वैभव पाराशर, प्रकाश गुंडावार, सुरेश गारघाटे, सुशांत भांडारकर, मिथुन मित्रा, हितेश जोशी, महेश अडगुरवार, राहुल चौधरी, माधवी भट्ट,कल्याणी बोरकर,स्नेहल राऊत, मुग्धा कक्कड-खत्री, गौरी राऊत, अमृता दुधे,शुभदा कक्कड, शितल खोंडे, प्रिया लाड,सोनाली सुर, सोनु वानखेडे,स्वरा गायकवाड,स्नेहल कावळे, आरणा भांडारकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.
नवोदीताच्या टीमचे पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे

