सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी गडचिरोली येथे जोरदार लक्षवेधी निदर्शने, धर्मेंद्र प्रधान यांच्या बडतर्फीची मागणी.
गडचिरोली --NEET पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री मा. धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून बडतर्फ करावे आणि देशातील पर्यावरण प्रेमी आणि शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक यांनी नवी दिल्ली येथे सुरू केलेल्या उपोषणाची सन्मानपूर्वक सांगता करण्यात यावी या मागण्यांसाठी आज दुपारी गडचिरोली येथील इंदिरा चौकात सर्व पक्षिय भव्य लक्षवेधी निदर्शेने करण्यात आली.विविध राजकीय पक्ष तथा सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचे विरोधात जोरदार नारेबाजी करीत आपला संताप व्यक्त केला तसेच केंद्र सरकार या महत्वपूर्ण व गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे म्हटले. २० जुलै च्या आत न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी आंदोलकांनी दिला . आंदोलनात सहभागी सर्व पक्ष व संघटनांनी नवी दिल्ली येथे सुरु असलेल्या आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला.
त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे लिहिलेले निवेदन गडचिरोलीचे ठाणेदार विनोद चव्हाण याना आंदोलन स्थळीच सादर करण्यात आले.
या आंदोलनात अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे रोहिदास राऊत, भारतीय कॅम्म्युनिस्ट पक्षाचे डॉ महेश कोपुलवार, BRSP चे मिलिंद बांबोडे, रिपब्लिकनचे हंसराज उंदीरवाडे, भाकपचे देवराव चवडे, संविधान फॉउंडेशन चे गौतम मेश्राम, आदिवासी युवा परिषदेचे कुणाल कोवे, आदिवासी एम्प्लॉयीस फेडेरेशनचे माधव गावड, ओबीसी महासंघाचे प्रा. शेषराव येलेकर, अंनिसचे विलास निंबोरकर, सर्वोदय मंडळाचे प्रा. देवानंद कामडी, कास्ट्राईब संघटनेचे राजकुमार घोडेस्वार, वीर बाबुराव समितीचे वसंतराव कुलसंगे, मराठा सेवा संघाचे सुरेश लाडके, माली समाज संघटनेचे हरिदास कोटरंगे, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रा. गौतम डांगे, आदिवासी महिला संघटनेच्या आरती कोल्हे, छात्र भरतीचे अशोक राऊत, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. अशोक लांजेकर, तुळशीदास सहारे, सोनू अलाम रिपब्लिकन महिला आघाडीच्या नीता सहारे, सुनीता रायपुरे यांचेसह शेकडो कार्यकर्ते व नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळपासून पाऊस असताना सुद्धा या आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

