काटली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १५ एप्रिलला अनावरण

0
काटली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे १५ एप्रिलला अनावरण




गडचिरोली (अशोक खंडारे वैनगंगा वार्ता १९) : तालुक्यातील काटली येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व उद्घाटन सोहळा बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळ, काटली येथे आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती काटली तसेच अशोका फाउंडेशन बौद्ध समाज काटली व माता रमाई महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. विजयभाऊ वडेट्टीवार (विधानमंडळ तसेच तथा लोकलेखा समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष मा. रोहितदासजी राऊत ज्येष्ठ पत्रकार राहणार आहेत.
यावेळी दीपप्रज्वलन मा. अरुण पाटील मुनघाटे जिल्हा समन्वयक, आदिवासी कृती समिती गडचिरोली, मा. महेशभाऊ ब्राह्मणवाडे (जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी, गडचिरोली) तसेच मा. डॉ. बी.एस. सहारे (नोडल हॉस्पिटल, गडचिरोली) यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कूलसचिव गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली मा. अनिल हिरेखन मा. गौतम मेश्राम (सचिव, संविधान फाउंडेशन गडचिरोली) तसेच कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष काटली ग्रामपंचायतचे प्रशासक 
 मा. अरविंद उंडीरवाडे हे स्वागत करणार आहेत प्रमुख अतिथी रिपाइंचे जेष्ठ कार्यकर्ते ॲड, रामभाऊ मेश्राम, जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा तुलाराम राऊत, शहर अध्यक्ष कांग्रेस गडचिरोली सतीश विधाते,माजी सभापती प.स.गडचिरोली विलास दशमुखे,अभारीप अध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचीव विश्वजीत कोवासे,माजी जी
प उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, अब्दुल पंजवानी, डॉ यशवंत दुर्गे, पो.पा.कृष्णकांत मुनघाटे, उपसरपंच पार्वता खेडेकर, ग्रामपंचायत सदस्य राजुभाऊ भोयर, वैनगंगा वार्ता १९ चे संपादक अशोक खंडारे, 
सेवानिवृत्त नायब तहसीलदार सिद्धार्थ खंडारे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार पुंजाराम खंडारे,साखरा ग्रामपंचायत चे प्रशासक पुण्यवान सोरते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास परिसरातील विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे :
दुपारी ३.३० वाजता – भिक्षूंनी धर्मदेशना व कार्यक्रमाची सुरुवात
सायं. ४.०० वाजता – उद्घाटन सोहळा
सायं. ४.४५ वाजता – दीपप्रज्वलन
सायं. ५.०० वाजता – पुतळ्याचे अनावरण
सायं. ५.१५ वाजता – स्वागत समारंभ व मार्गदर्शन
सायं. ६.०० वाजता – भोजन कार्यक्रम
त्यानंतर रात्री ९ वाजता भीमगीत, बुद्धगीत, फुलेगीत व मनोरंजनाचा सांस्कृतिक कार्यक्रम मंथन अँड ग्रुप आरमोरी यांच्या भिम गीतांच्या मेजवानीने रंगणार आहे.
या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष टेकाजी उंदिरवाडे, उपायुक्त काशिनाथ खंडारे, सचिव कैलाश शिंपी, कोषाध्यक्ष रमेश उंदिरवाडे,आदिंनी केले आहे 
काटली येथील आयोजक आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेत. सायंकाळी स्नेहभोजन ठेवण्यात आले आहे तरी कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करण्यात आली आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !