ग्रामपंचायत ने खुले केले अभ्यासाचे दालन, पोलीस दलात भरती झाले अनखोडाचे आठ तरुण!

0
ग्रामपंचायत ने खुले केले अभ्यासाचे दालन,  पोलीस दलात  भरती झाले अनखोडाचे आठ तरुण!


आष्टी (अशोक खंडारे) :- चामोर्शी तालुक्यातील अनखोडा ग्रामपंचायतने अभ्यासाचे दालन खुले केल्यामुळे  अनखोडा गावांतील आठ होतकरू तरुण तरुणिंची गडचिरोली जिल्हा पोलीस दलात नियुक्ती झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व ग्रामपंचायत ने  अभ्यासीका सुरू केल्याने हे यश विद्यार्थ्यांना मिळाले आहे त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत असून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लहानपणापासूनच पोलीस दलात सेवा करण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून संबंधित तरुणाने जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. ग्रामीण भागातील मर्यादित साधनसामग्री असूनही त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. अखेर त्यांच्या परिश्रमाला यश मिळत गडचिरोली जिल्हा पोलीस दलात अरविंद तिमाडे, संकेत कोहपरे, जाॅकी निमसरकार, मेघा निमसरकार, श्रृती गुरुकर, साक्षी कोसरे, सानिका चहारे, डिंपल खरबनकर, त्यांची निवड झाली आहे.
या यशामुळे अनखोडा गावाचे नाव उज्ज्वल झाले असून परिसरातील तरुणांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल गावातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, मित्रमंडळी तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, कुटुंबीयांनीही आपल्या मुलांने पोलीस दलात स्थान मिळविल्याचा अभिमान व्यक्त केला. समाजसेवा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
अनखोडा गावातील या तरुणांच्या यशामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !