महापुरुषांचे पुतळे सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना व गैर मार्गाने बसवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या व्यक्तींच्या विरुद्ध तात्काळ कडक कारवाई करा - डी.के. साखरे

0
महापुरुषांचे पुतळे सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना व गैर मार्गाने बसवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या व्यक्तींच्या विरुद्ध तात्काळ कडक कारवाई करा - डी.के. साखरे



मंगळवेढा  - (अशोक खंडारे)सर्वच महापुरुष आम्हाला वंदनीय आहेत; परंतु महापुरुषांचे पुतळे सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना व गैरमार्गाने बसवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍या व्यक्तींच्या विरुद्ध तात्काळ कडक कारवाई करा अशी मागणी दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी.के. साखरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
साखरे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, महापुरुष हे कोणत्याही एका जातीचे नसून ते सर्व समाजाचे पर्यायाने संपूर्ण राष्ट्राचे आहेत. त्यामुळे महापुरुषांच्या पुतळ्याला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 
    परंतु अलीकडच्या काळात काही लोक रात्री अपरात्री चोरासारखे महापुरुषांचे पुतळे सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना व गैर मार्गाने बसवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. अशा व्यक्तींच्या विरुद्ध तात्काळ कडक कारवाई केली पाहिजे असे साखरे यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून जर पुतळे उभारले तर समाजात चुकीचा संदेश जाऊन सर्वच महापुरुषांचे अनुयायी सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना व गैर मार्गाने पुतळे उभारतील असेही साखरे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !