“दिवसभर रांगेत, शेवटी रिकाम्या हाताने परत!” – आष्टीतील गॅस ग्राहकांचा संताप उसळला

0
“दिवसभर रांगेत, शेवटी रिकाम्या हाताने परत!” – आष्टीतील गॅस ग्राहकांचा संताप उसळला 

“गॅस येणार” म्हणत ठेवली आशा… सायंकाळी निराशा; प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी


आष्टी (ता. चामोर्शी) : येथील गॅस एजन्सीसमोर आज नागरिकांचा संताप उफाळून आला. “गॅसची गाडी येणार आहे” असे सकाळपासून सांगण्यात आल्यामुळे मोठ्या संख्येने गॅस धारक एजन्सीसमोर रांगेत उभे राहिले होते. मात्र, दिवसभर प्रतीक्षा केल्यानंतर सायंकाळी अचानक “आज गॅसची गाडी येणार नाही” असे सांगण्यात आल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.
यामुळे विशेषतः गोरगरीब आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले. दिवसभर आपली रोजी-रोटी सोडून गॅससाठी उभे राहिलेल्या नागरिकांना शेवटी निराशा पदरी पडली. महिलांनाही याचा मोठा त्रास सहन करावा लागला.
गॅस एजन्सीच्या या हलगर्जीपणामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “वेळेवर आणि योग्य माहिती दिली असती तर आम्हाला दिवसभर त्रास सहन करावा लागला नसता,” अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, संबंधित प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, गॅस वितरणाची पारदर्शक आणि नियोजित व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारे नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये, अशीही मागणी जोर धरत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !