२८ फेब्रुवारी ला आष्टी येथे हिंदू संमेलन
आष्टी (अशोक खंडारे):-
सनातन धर्म व हिंदू
संस्कृतीला नवी दिशा निर्मिती करून सामाजिक एकतेच्या दृढतेसाठी येथील सकल हिंदू समाजाच्या सौजन्याने शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीच्या रंगमंचावर हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदू संमेलनाला हरणघाट येथील संत श्री मुरलीधर महाराज, इस्कान मंदिर कृष्णनगर चामोर्शी येथील परमेश्वरदास महाराज, चंद्रपूर विभाग समग्र ग्रामविकास प्रमुख जयप्रकाश शेंडे यांची विशेष उपस्थिती असून संघटित सनातन धर्माविषयी मार्गदर्शन लाभणार आहे. संमेलनाला सकल हिंदू समाजबांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कालीबाडी दुर्गा मंदिर समिती, हनुमान मंदिर, महादेव मंदिर, श्रीराम मंदिर, साई मंदिर, वैनगंगा शिव मंदिर, इस्कान मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय समिती यांनी केले आहे
शोभायात्रेचे आयोजन
संमेलनानिमित्त दुपारी ४ वाजता कालीबाडी दुर्गा मंदिराच्या प्रांगणातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हनुमान मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीराम मंदिर मार्गे ग्रामपंचायत रंगमंच परिसरात आणण्यात येईल. शोभायात्रा रंगमंच परिसरात पोहोचल्यावर सायंकाळी ७वाजता संमेलन कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे.

