आष्टी पोलीसांनी –मार्कंडा (कंन्सोबा) मार्गावर स्वीप्ट डिझायर गाडीतून लाखोची अवैध दारूची तस्करी करताना पाठलाग करून केले जेरबंद

0
आष्टी पोलीसांनी –मार्कंडा (कंन्सोबा) मार्गावर स्वीप्ट डिझायर गाडीतून लाखोची अवैध दारूची तस्करी करताना पाठलाग करून केले जेरबंद

तीन लाख चौरेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 


 आष्टी– चंद्रपूर कडून आलापल्ली कडे दारु तस्करी करीत असलेले वाहणाला मार्कंडा (कंन्सोबा) मार्गावर पाठलाग करून आष्टी पोलिसांनी धडक कारवाई करत अवैधरित्या वाहतूक केली जात असलेली दारूसह वाहण जप्त केले गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणावर दारूसाठ्यासह वाहन ताब्यात घेण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ३३ के ९९६१ क्रमांकाचे वाहन गोंडपिपरी येथून आलापल्ली–अहेरी दिशेने जात असताना पोलिसांनी संशयावरून पाठलाग केला. आष्टी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातून वाहनाचा मागोवा घेत आलापल्ली रोडवरील कोहळे पेट्रोल पंप ते पंदिलवार लेआउट वळणावर वाहन अडवून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान वाहनात मोठ्या प्रमाणात अवैध दारू आढळून आली. पोलिसांनी १५०० नग (९० एमएल) दारू अंदाजे १,२०,००० रुपये, हायवर्ड बियर १२० नग किंमत २४,००० रुपये, तसेच वापरती स्विफ्ट डिझायर कार किंमत सुमारे २,००,००० रुपये असा एकूण ३,४४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणात वाहन चालक सुनील सिंग प्रतापसिंग बैस (वय ४९) रा. कन्यका मंदिर, बाजारवाडी, चंद्रपूर यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध पोलिस स्टेशन आष्टी येथे मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक गोकुलदास मेश्राम  पोलिस कर्मचारी कु. गणविर व राठोड यांनी केली.
संशयास्पद वाहन अडवून तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दारूसह वाहन जप्त करून पुढील तपास सुरू केला असून अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या कारवाईमुळे अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा धडक कारवाईचा इशारा पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. अधिक तपास  पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोकुलदास मेश्राम करीत आहेत
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !