रोजगारावर स्थानिकांचा हक्क प्रथम.... इल्लूर वासियांचा एल्गार

0
रोजगारावर स्थानिकांचा हक्क प्रथम.... इल्लूर वासियांचा एल्गार 



आष्टी (अशोक खंडारे):-
    गडचिरोली जिल्हयात लोहखनिजावर आधारित उद्योग प्रकल्प हळूहळू विस्तारत आहे..गडचिरोली जिल्हयातील एकमेव कागद कारखाना असलेल्या चामोर्शी तालुक्यातील ईल्लुर येथील प्रकल्प अखेरच्या घटका मोजत आहे. त्यात हा प्रकल्प लोहखनिजावर आधारित उद्योग कंपनी ला बिल्ट कंपनीने हस्तांतर केल्याच्या बातम्या येवू लागल्या त्याची अजुनपर्यंत अधिकृत घोषणा झाली नाही.. मात्र हळूहळू या कंपनीत काही बाहेरचे लोक कामाला येत असल्याची चाहूल लागताच इल्लुर येथील स्थानिक नागरिकांनी हल्लाबोल केला व या ठिकाणी कोणताही उद्योग प्रकल्प स्थापन झाल्यास पहिला रोजगाराचा हक्क हा स्थानिकांचा असेल असा निर्वाणीचा इशारा दिला. 

  खरे तर ईल्लुर येथील शेतकऱ्यांनी कागद कारखान्याला 1990 मध्ये जमिनी दील्या मात्र एक जेमतेम एका पिढीला रोजगार मिळाला.. आणि कागद कारखान्याला अखेरची घरघर लागली.. व दुसरी पिढी बेरोजगार राहिली.. हक्काची शेतकऱ्यांची जमीन कंपनीच्या मालकीची झाली.. आता बिल्ट कंपनीने ही जागा लोहखणीज कंपनीला विकली कि लिज वर दिली हे गुलदस्त्यात आहे... मात्र या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांवर संकट कोसळले आहे.. तसेच लोहखानिज कंपनीने प्रकल्प सुरु केल्यास स्थानिकांना रोजगारात प्रथम प्राधान्य मिळेल काय अशी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.. त्यामुळे स्थानिक रस्त्यावर उतरला आहे..
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !