आष्टी येथील एक तरुण पोलीस अधिकारी सांगून करीत होता खंडणी वसूल मात्र अहिल्यानगर पोलीसांनी केले जेरबंद

0
आष्टी येथील एक तरुण पोलीस अधिकारी सांगून करीत होता खंडणी वसूल मात्र अहिल्यानगर पोलीसांनी केले जेरबंद 


.



प्रतिनिधी प्रमोद झरकर उपसंपादक वैनगंगा वार्ता १९ गडचिरोली

चामोर्शी :  आष्टी येथील एक तरुण पोलीस अधिकारी असल्याचे भासवून सर्वसामान्य नागरिकांना अटकेची भीती दाखवत लाखो रुपयांची खंडणी मागणारा सराईत आणि उच्चशिक्षित भामटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अहिल्यानगर सायबर पोलिसांनी गडचिरोली जिह्यातील नक्षलग्रस्त भागात सिनेस्टाईल पाठलाग करून चंदन दिगूराम सांगळे वय, 30 वर्ष रा. आष्टी ता. चामोर्शी जि. गडचिरोली याला बेड्या ठोकल्या आहेत.

तोतया पोलीस बनून तो तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर नागरिकांची फसवणूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे. अहिल्यानगरमधील एका फिर्यादीला आरोपी चंदन सांगळे याने फोन करून आपली ओळख " वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल पाटील " अशी करून दिली.

तुमच्याविरुद्ध गंभीर तक्रार आली असून, तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला अटक करायची नसेल, तर 5 लाख रुपये द्या, अशी धमकी त्याने दिली. या प्रकरणी सायबर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि अपर पोलीस अधीक्षक
वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तात्काळ गडचिरोली ला रवाना झाले.

तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचे लोकेशन आष्टी ता. चामोर्शी परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस येत असल्याचे पाहताच आरोपीने दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग असूनही पोलिसांनी मोठ्या जिद्दीने पाठलाग करून स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !