आष्टी ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर व 108 रुग्णवाहिका मंजुर करा
शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन
आष्टी -(अशोक खंडारे ):-राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर हे दिनांक 13 ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्हयाच्या दौऱ्यावर असताना आष्टी येथे आगमन झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी शेकडो शिवसैनिकांसह त्यांची भेट घेत आष्टी ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर व 108 रुग्णवाहिका मंजूर करण्यासंबंधीचे निवेदन दिले. आष्टी हे जिल्हयातील मध्यवर्ती ठिकाण असुन 353 C गडचिरोली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथून अवजड व ईतर वाहनांची वर्दळ मोठया प्रमाणात असते त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आष्टी ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर व 108 रुग्णवाहिकेची सोय नसल्याने अपघात ग्रस्तांना व रुग्णांना वेळीच उपचार मिळत नाही तसेच पुढील उपचारासाठी पाठविण्यास विलंब होतो परिणामी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला. या गंभीर बाबी लक्षात घेता आष्टी ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर व 108 रुग्णवाहिका मंजुर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

