सर्वात मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात, लँडिंगवेळी बारामतीत दुर्घटना
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मुंबईहून पुण्याकडे (बारामतीकडे) येत असताना लैंडिंग करताना अपघात झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या सभेसाठी बारामती जात असताना हा अपघात घडला. या अपघातमध्ये अजित पवार यांचे निधन झाले आहे.
पुणे : आताच्या घडीची मोठी बातमी समोर आली आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. मुंबईहून पुण्याकडे म्हणजेच बारामतीकडे येत असतान हा अपघात झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित दादा हे सभेसाठी बारामतीला येत होते. या अपघातग्रस्त ठिकाणाचा व्हिडीओ समोर आलाय, या अपघातामध्ये काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांचे पीए आणि काही जवळचे लोक सोबत होते, सर्वांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. लँडिंग करताना विमानाला अपघात झाला. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक हे रणजित शिवतरे हे बारामती विमानतळावर पोहोचले आहेत. या अपघाताबाबत त्यांनी ही माहिती दिली आहे.
बारामती विमानतळाजवळील एका शेतामध्ये विमान कोसळलं आहे. हा अपघाता ९ ते ९.१५ दरम्यान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. अपघातग्रास्त विमान आगीतपूर्णपणे खाक झाले. विमान अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे. विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत विमानतळ प्रशासनाकडून अधिकृत माहिती आलेली नाही. ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी जशी माहिती समजेल तशी अपघाताच्या ठिकाणी गर्दी होत आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबती कोणतीही माहिती अद्याप समोर आला नाही. तांत्रिक बिघडामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. विमानामध्ये वैमानिकासह एकूण सहा जण होते, सर्वांना रूग्णालयात हलवण्यात आले आहे
अजित पवारांच्या निधनाची बातमी आली तेव्हा सर्व पवार कुटुंब हे दिल्लीमध्ये एकत्र होतं. या अपघाताची बातमी समजल्यावर सर्व पवार कुटुंब बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहे. राष्ट्रवादीचे नेत्यांसाठी मोठा धक्का बसला असून दादांच्या अकाली एक्झिटने हळहळ व्यक्त होत आहे.

