लगाम हेटी येथे पेसा योजनेंतर्गत कुपनलिकेचा शुभारंभ

0
लगाम हेटी येथे पेसा योजनेंतर्गत कुपनलिकेचा शुभारंभ 




लगाम (अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९):-
मुलचेरा तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायत लगाम अंतर्गत लगाम हेटी येथे पेसा ५% थेट निधी योजनेंतर्गत मंजूर निधीतून उभारण्यात आलेल्या नवीन कुपनलिका उद्घाटन दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाले. सदर उद्घाटन माननीय श्री. विजय एल. पेंदाम, गटविकास अधिकारी, पंचायत समिती मुलचेरा तसेच माननीय सरपंच श्री. दिपक मडावी, मा.श्री. मधुकर मडावी पेसा अध्यक्ष, श्रीमती वनश्री पेंदाम महिला प्रतिनिधी श्री. आकाश आंबोरकर, तालुका व्यवस्थापक (पेसा), श्री. अजय मोटघरे व श्री. प्रशांत कोल्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी भागात पिण्याच्या पाण्याची दीर्घकालीन समस्या लक्षात घेऊन ग्रामसभेच्या ठरावानुसार सदर कामास पेसा निधीतून मंजुरी देण्यात आली होती. पेसा योजनेंतर्गत नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित व सातत्यपूर्ण पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून कुपनलीकेचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमास राकेश टि. दुर्गे, ग्रामपंचायत अधिकारी, सुरेखा मडावी पेसा मोबिलायझर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसभा पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महिला बचतगटांच्या प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातपंप कार्यान्वित झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दूर अंतरावर जावे लागणार नसून, विशेषतः महिला, वृद्ध नागरिक व लहान मुलांना याचा मोठा लाभ होणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पेसा कायद्यांतर्गत ग्रामसभेला प्राप्त अधिकारांचा प्रभावी व योग्य वापर करून स्थानिक गरजांनुसार विकासकामे राबविण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पेसा योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अशा लोकाभिमुख व मूलभूत सुविधा पुरविणाऱ्या उपक्रमांमुळे आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असून, नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी पेसा निधीतून उपलब्ध झालेल्या या सुविधेबद्दल समाधान व्यक्त करून संबंधित प्रशासन, ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी यांचे आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !