प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचं नाव का घेतलं नाही ? वन कर्मचाऱ्याचा मंत्री महाजनांना सवाल

0

प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचं नाव का घेतलं नाही ? वन कर्मचाऱ्याचा मंत्री महाजनांना सवाल



नाशिकः नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाचा पोलिस परेड ग्राउंड येथे सुरू असलेल्या मुख्य शासकीय सोहळ्या दरम्यान एक खळबळजनक घटना घडली. ध्वजारोहण सोहळ्या प्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे भाषण सुरू असताना एकच गोंधळ झाला. वनविभागाच्या एका महिला कर्मचाऱ्याने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव का घेतले नाही?' अशा शब्दांत मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारला. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे काही काळ सोहळ्यात व्यत्यय आला होता. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने संबंधित महिलेला ताब्यात घेतले. माधुरी जाधव असे या महिलेचे नाव आहे.

पोलीस परेड मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन हे उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी भाषणात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घ्यायचे राहून गेल्याचा आरोप या महिला कर्मचाऱ्याने केला. भर कार्यक्रमात ही महिला आपल्या जागेवरून उठून थेट मैदानाकडे धावली आणि आरडाओरडा करत निषेध नोंदवू लागली होती. त्यामुळे काहीकाळ एकाच गोंधळ उडाला होता 

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासन आणि पोलीसांची तारांबळ उडाली होती. मात्र, प्रसंगावधान राखून तेथे तैनात असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित महाराष्ट्र शासन वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याला रोखत तिला तातडीने ताब्यात घेण्यात आले. या घटनेचे पडसाद प्रशासकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता असून संबंधित महिला अधिकाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही का? करावी व जर केली तर मोठा तुफान उठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे 

मी मातीकाम करेन. मला निलंबित करायचे तर करा. पण बाबासाहेबांना संपवायचे काम करायचे नाही. पालकमंत्री संविधानामुळे आहेत. कोणताही जातीभेद नाही. सर्व समानता घटनेमुळे आहे. प्रजासत्ताक दिनाचे मानकरी असलेल्या बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव का घेतले जात नाही, असा सवाल करत महिला कर्मचाऱ्याने तीव्र संताप व्यक्त केला. या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !