मंगळवेढा येथे उद्या "जोडे मारो" आंदोलन
मंगळवेढा - दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात संविधानाचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या उल्लेख जाणीव पूर्वक व जातीय मानसिकतेतून नाव न घेणारे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला बुधवार दिनांक 28 /01/2026 रोजी दुपारी 1 वाजता मंगळवेढा येथील प्रांत कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात येत असुन सदर आंदोलनात तमाम आंबेडकरप्रेमी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन दलीत अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष डी. के. साखरे यांनी केले आहे.

