इस्त्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी कौशल्य विकास केंद्राचे तरुणांना आवाहन

0
इस्त्राईलमध्ये रोजगाराची सुवर्णसंधी 
कौशल्य विकास केंद्राचे तरुणांना आवाहन


गडचिरोली, (जिमाका) दि.05:भारत सरकार आणि इस्त्राईल सरकार यांच्यातील द्विपक्षीय करारानुसार, भारतीय कामगारांना इस्त्राईलमध्ये विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत प्रामुख्याने 'केअरगिव्हिंग' (Caregiving) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती गडचिरोली येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने देण्यात आली आहे भारत सरकारचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (MSDE) आणि इस्त्राईलची 'पॉप्युलेशन अँड इमिग्रेशन अथॉरिटी' (PIBA) यांच्यात पाच अंमलबजावणी प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.बांधकाम (Construction), केअरगिव्हिंग, वाणिज्य व सेवा, रेस्टॉरंट आणि उत्पादन (Manufacturing).जून २०२६ पासून सुरू होणाऱ्या एका वर्षाच्या कालावधीसाठी सुमारे ३,५०० होम-बेस्ड केअरगिव्हर्सची आवश्यकता आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात ३५० केअरगिव्हर्सची निवड १ जून २०२६ पर्यंत केली जाणार आहे ही निवड प्रक्रिया नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) द्वारे राज्य कौशल्य विकास विभाग/मिशनच्या समन्वयाने पार पडणार असून उमेदवारांचे योग्य स्क्रीनिंग केले जाईल.पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी रोजगाराच्या सविस्तर माहितीसाठी आणि अर्जासाठी खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी maharashtrainternational.com/jobDetail.aspx ज्या उमेदवारांना अधिक माहिती  हवी आहे, त्यांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.-२, युनिट क्रमांक-२ कॉम्प्लेक्स, पोलीस मुख्यालयासमोर, गडचिरोली येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्तांनी केले आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !