आपल्या अंगातील विचार ओळखायला शिका त्यातून साहित्य निर्माण होईल. संतांनी कवितेतून साहित्य सादर केले- प्रा. डॉ.विठ्ठल चौथाले यांचे प्रतिपादन

0

आपल्या अंगातील विचार ओळखायला शिका त्यातून साहित्य निर्माण होईल. संतांनी कवितेतून साहित्य सादर केले- प्रा. डॉ.विठ्ठल चौथाले यांचे प्रतिपादन 



आष्टी (अशोक खंडारे):-
आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याचे काम संमेलनाध्यक्षांनी केले आहे .आपले साहित्य लेखणीतून सुरु करावे .आपल्या अध्यापनातून चांगला विद्यार्थी घडवावा.साहित्यातून माणसं पेरली जातात .आपल्या अंगातील विचार ओळखायला शिका त्यातून साहित्य निर्माण होईल .संतांनी आपल्या कवितेतून साहित्य सादर केले.गाडगेबाबांच्या विचारातून साहित्य निर्माण झाले. असे प्रतिपादन इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय,येणापूर येथील प्रा. डॉ. विठ्ठल चौथाले यांनी केले.
मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित गडचिरोली जिल्हा पहिले आदिवासी संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना केले.
याप्रसंगी संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ विनायक तुमराम , स्वागताध्यक्ष वनवैभव शिक्षण मंडळाचे सचिव बबलू भैया हकीम , प्रमुख पाहुणे म्हणून दृष्टी फाउंडेशन च्या अध्यक्षा शाहीन हकीम , प्रा. धनराज खानोरकर , प्राचार्य डॉ. संजय फुलझेले , प्राचार्य रणजीत मंडल , पोलिस उपनिरीक्षक वैशाली जगताप , मुख्य संयोजक प्रा. डॉ राज मुसणे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलतांना प्रा. खानोरकर म्हणाले वाचनातूनच ज्ञान ज्ञान समृद्ध होते . तुकाराम महाराजांनी माणसं वाचली होती . आपली लोकसंस्कृती आपणच टिकून ठेवली पाहिजे. शब्दांमध्ये घाव करण्याची ताकद आहे. शब्दातील अक्षरे साहित्यात आले पाहिजे. आदिवासींनी खरी संकृती जपली आहे .साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून आदिवासींना त्यांचा वाटा उपलब्ध करून द्यावा.
संमेलनाध्यक्ष डॉ.तुमराम म्हणाले साहित्य संमेलनातून आदिवासी माणूस प्रकटला पाहिजे . साहित्य आपल्या वागण्यातून प्रगटले पाहिजे. साहित्य अंधारातून उजेडाकडे नेते.या देशात संपूर्ण घटकांना न्याय मिळत नसेल तो देश अपूर्णच आहे. साहित्य हे दुधारी तलवार आहे. आदिवासींची ओळख त्यांच्या आदिवासी नावाने झाली पाहिजे.
याप्रसंगी बबलू भैया हकीम , डॉ रणजीत मंडल , प्राचार्य फुलझेले , शाहीन हकीम , आदींनी भाषणे दिली.
याप्रसंगी मुख्य संयोजक प्रा.डॉ.राज मुसणे म्हणाले सामाजिक , शैक्षणिक ,क्रीडा क्षेत्रात योगदान देणारी ही संस्था आहे.संस्थेचे अध्यक्ष बबलू भैया हकीम हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने हे साहित्य संमेलन यशस्वी झाले . संस्थांतर्गत येणाऱ्या सर्व शाळेतील प्राचार्य , मुख्याध्यापक , प्राध्यापक ,शिक्षकांनी पुरेपूर सहकार्य केले. या दोन दिवस झालेल्या साहित्य संमेलनात कवींनी आपल्या कविता सादर केल्या.त्यासर्व जतन केल्या जाईल व त्या सर्व साहित्यांचा संग्रह प्रकाशित करण्यात येईल. कार्यक्रमांचे संचालन प्रा.गणेश खुणे यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रा.रवी शास्त्रकार यांनी केले.
या साहित्य संमेलनात संस्थेतील प्राचार्य लोनबले , प्राचार्य किशोर पाचभाई , माजी प्राचार्य लवली शेख , माजी प्राचार्य शेख , प्राचार्य रणजीत मंडल , प्राचार्य बेपारी , प्राचार्य शाहिद शेख , सर्व प्राध्यापक व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !