अज्ञात इसमाने पेटविला धानाचा पुंजना, शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान

0
अज्ञात इसमाने पेटविला धानाचा पुंजना, शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान 

नुकसान भरपाई देण्यात यावी 


आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील चांदेश्वर या गावात शेतातील धानाचे पुंजने एका अज्ञात इसमाने पेटवल्याची घटना दि. २६ डिसेंबर ला सायंकाळचे सुमारास उघडकीस आली. 
यादव तुकाराम निमसरकार रा. वायगाव या शेतकऱ्यांची शेती ही चांदेश्वर( सगनापूर) या गावात आहे कुणितरी अज्ञात इसमाने धानाचे पुंजने पेटल्याचे माहीत होताच त्या शेतकऱ्याला धक्काच बसला त्यानी लागलीच गाव महसूल अधिकारी यांना माहिती दिली तेव्हा त्यांनी पंचनामा करून घेतला आहे सदर शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले असून त्याचेवर उपासमारीची पाळी येऊन ठेपली आहे म्हणून शासनाने त्यास नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !