शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे माजी विद्यार्थ्यांची स्नेह मिलन सभा संपन्न

0
शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे माजी विद्यार्थ्यांची स्नेह मिलन सभा संपन्न



गडचिरोली (अशोक खंडारे):-
     स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गोकुळ नगर गडचिरोली येथे माजी विद्यार्थ्यांची  स्नेह मिलन सभा दिनांक २७ डिसेंबर रोज शनिवार ला सकाळी १० वाजता पार पडली.
        शासन निर्णय १ ऑक्टोबर २०२५ नुसार प्रत्येक शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या शैक्षणिक विकासात थेट सहभागी करून घेणे, भौतिक सुविधांची उपलब्धता,शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत करणे, माजी विद्यार्थ्यांचा शाळेसोबत असणारा  ऋणानुबंध घटक करणे, माजी विद्यार्थ्यांचा शाळेत मेळावा आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या यशातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे ही सर्व जबाबदारी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन पार पाडावी असे अपेक्षित आहे.
       याकरिता शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गोकुळ नगर गडचिरोली येथे माजी विद्यार्थ्यांची स्नेहमिलन सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवीणा ला उजाळा देऊन चर्चा करून माजी विद्यार्थी संघाची रचना पुढील जानेवारी  महिन्यात एक विशेष सभा आयोजित करून करण्याचे ठरविण्यात आले.
    या सभेला शाळेचे माजी विद्यार्थी असलेले माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी, माजी आमदार डॉक्टर देवराव होळी, डॉक्टर सचिन हेमके, डॉक्टर किशोर वैद्य, डॉक्टर रवींद्र चौधरी,१९६२ च्या पहिल्या बॅचचे जनार्दन भांडेकर, सुभाष धंदरे, आशिष ब्राह्मणवाडे, अनिल तिडके अरुण पाटील मुनघाटे, धनेंद्र चौधरी, राजेश जंगावार, पवन मुनघाटे, रवींद्र  म्हशाखेत्री, राजेंद्र गोहणे, संजय घोटेकर, सचिन म्हशाखेत्री,संदीप म्हशाखेत्री, मुकेश पदा,संकेत म्हशाखेत्री, प्रणय उराडे इत्यादी आणि शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. 
   पुढील जानेवारी महिन्यात होणाऱ्या 'माजी विद्यार्थी संघ' रचनेच्या सभेला जास्तीत जास्त शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित असावेत याकरिता सर्वांनी प्रयत्न करावेत  असे आवाहन शाळेचे प्राचार्य  अरुण तेजराम मुनघाटे यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !