शिवाजी हायस्कूल गडचिरोली येथे माजी विद्यार्थी संघ स्थापना सभा
गडचिरोली:-
शासन निर्णय दिनांक १ ऑक्टोबर २०२५ नुसार प्रत्येक शाळेमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून पदाधिकारी निवड करणे गरजेचे आहे. यात माजी विद्यार्थी संघाची रचना करणे आहे. त्याचप्रमाणे माजी विद्यार्थी संघाकडून शाळेकरिता काही कार्य करून घेणे शासनाला अपेक्षित आहे जसे भौतिक सुविधा व पूरक सुविधा उभारणी, शैक्षणिक व गुणवत्ता वर्धन कार्य, विद्यार्थी गुणवत्ता विकास, सामाजिक व भावनिक बंधिलकी, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती पुरस्कार याशिवाय शाळांचा दर्जा उंचवण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढविणे, माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या शैक्षणिक विकासात थेट सहभागी करून घेणे, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत करणे,माजी विद्यार्थ्यांचे शाळेसोबत असणारे ऋणानुबंध घट्ट करणे, माजी विद्यार्थ्यांचे शाळेत मेळावे आयोजित करून मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, त्यांचे यशापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, माजी विद्यार्थ्यांचे आपल्या गावाशी मातीशी संबंध घट्ट करणे ही सर्व जबाबदारी आता माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन पार पाडावी असे अपेक्षित आहे. याकरिता शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय,गोकुळ नगर गडचिरोली येथील गडचिरोली व परिसरात किंवा इतरत्र असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची सभा २७ डिसेंबर रोज शनिवार ला सकाळी १० वाजता शाळेमध्ये आयोजित केलेली आहे. या करिता सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे समकालीन सहकारी यांना माहिती द्यावी आणि या सभेला उपस्थित असावे असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री अरुण तेजराम मुनघाटे यांनी एका परिपत्रकातून केलेले आहे.

