आष्टी परिसरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक यांच्या पुढे मोठे आव्हाण!
आष्टी (अशोक खंडारे):-
आष्टी पोलीस ठाण्याच्या नेतृत्वात बदल झाला आहे. पोलीस निरीक्षक विशाल काळे यांची बदली झाल्यानंतर कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार वाघ यांच्यावर आष्टीची पोलीस स्टेशन ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आता आष्टीतील अवैध धंद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र होणार का, हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत बऱ्याच गावखेड्यात अवैधरित्या दारु विक्री होत आहे तसेच जुगार,मटका , घुटका याचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे
आष्टी,अनखोडा, कोनसरी इल्लूर, ठाकरी, कुनघाडा, चंदनखेडी, राममोहणपूर, येणापूर, मुधोली, ठाकुरनगर तसेच इतरही गवात अवैध दारु विक्री सुरू आहे परिसरातील गावांमध्ये जुगार, मटका याला उधाण आले आहे, गुठखा व सुगंधीत तंबाखू ची राजरोसपणे विक्री सुरू आहे
सुरजागडचा लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकला आष्टी गावातून स्पिड कमी करण्यासाठी प्रयत्न व शाळेच्या वेळेत ट्रकांना पायबंध घालण्यात येईल काय?
आता नव्याने आष्टी पोलीस स्टेशन येथे रुजू झालेले पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ या सर्व बाबिकडे लक्ष घालून सामान्य जनतेला न्याय देणार काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
‘कारवाई कागदावरच नको, तर मैदानात दिसली पाहिजे!’
अवैध धंद्यांवर कारवाई करताना केवळ किरकोळ प्रकरणांपुरते मर्यादित न राहता त्यामागील मुख्य सूत्रधारांपर्यंत पोलिसांनी पोहोचावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नियमित गस्त, अचानक छापे आणि बेकायदेशीर व्यवसायांना संरक्षण देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई झाली, तरच पोलिसांचा खरा धाक निर्माण होईल.
आता वाघांची ‘धडकी’ भरवणारी कारवाई कधी?
आष्टीतील नागरिकांना नव्या ठाणेदारांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अवैध धंद्यांना आळा, गुन्हेगारीला लगाम आणि कायदा-सुव्यवस्थेला बळ देण्यासाठी ठाणेदार वाघ यांनी कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.

