साहित्य संमेलनातून कलागुण , परंपरा , रूढी जोपासून प्रभावी साहित्यिक निर्माण व्हावा- प्रा.डॉ.विनायक तुमराम

0
साहित्य संमेलनातून कलागुण, परंपरा, रूढी जोपासून प्रभावी साहित्यिक निर्माण व्हावा- प्रा.डॉ.विनायक तुमराम  


    आष्टी:- साहित्य माणसाला  योग्य दिशा , नजर , व मनोकामना पूर्ण करायला प्रेरणा देते .स्व. हकीम साहेबांनी लावलेले शिक्षणाचे रोपटे आज वटरूक्षात रूपांतर होऊन शिक्षणाचा सुगंध दरवळत आहे. या वटवृक्षाचे जतन येथील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करावा.या साहित्य संमेलनातून प्रभावी साहित्यिक निर्माण व्हावा .असे प्रतिपादन प्रा. डॉ.विनायक तुमराम यांनी केले.               मराठी भाषा विभाग , महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई अंतर्गत वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाच्या पटांगणात आयोजित गडचिरोली जिल्हा पहिले आदिवासी साहित्य संमेलनाच्या  अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
याप्रसंगी उदघाटक म्हणून जेष्ठ रंगकर्मी , पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. परशुराम खुणे हे होते , तर स्वागताध्यक्ष म्हणून बबलू भैया हकीम  , प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बेबी बुरांडे , माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी , शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे , प्राचार्य हिराजी बनपूरकर , प्राचार्य संभाजी वारकर , दृष्टी फाउंडेशन च्या अध्यक्षा शाहीन हकीम , प्रा. डॉ.प्रमोद मुनघाटे , माजी प्राचार्य शमशेरखान पठाण , माजी प्राचार्य लीना हकीम , संजय पंदिलवार , सुवर्णपदक प्राप्त खेळाडू श्वेता कोवे , प्राचार्य डॉ.संजय फुलझेले , साहित्य संमेलनाचे संयोजक प्रा. डॉ.राज मुसणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातील माता सरस्वती व बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व दीपप्रज्वलन करुन साहित्य संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. 
याप्रसंगी स्वागतगीताने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले.
याप्रसंगी उदघाटक म्हणून बोलतांना डॉ परशुराम खुणे म्हणाले साहित्य हे माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल आणू शकतो , साहित्यामध्ये माणूस प्राण देखील अर्पण करु शकतो , साहित्य हे जीवनाची खरी संपत्ती आहे.तिचे योग्य जतन करावे. याप्रसंगी डॉ उसेंडी म्हणाले साहित्याची गरज आज आमच्या पिढीतील विद्यार्थ्यांना आहे. विद्यार्थ्यांनी आपआपल्या समाजातील रूढी  , परंपरा जोपासले पाहिजे व साहित्यिकांचे नाव आपल्या हृदयात साठवून ठेवावे.  याप्रसंगी प्राचार्य वारकर म्हणाले गडचिरोली जिल्ह्यातील पहिले आदिवासी साहित्य संमेलन याठिकाणी आयोजित करण्यात आले ही अभिनंदनीय बाब आहे. गडचिरोली जिल्हा हा भविष्यात भारतातील श्रीमंत जिल्हा असेल .आदिवासी संस्कृतीचा विसर पडू नये यासाठी अशा संमेलनाच्या आयोजनाची गरज आहे. या संमेलनातून आदिवासी समाजाची संस्कृती टिकवून ठेवली जावी .
याप्रसंगी स्वागताध्यक्ष बबलू हकीम म्हणाले हे आदिवासी साहित्य संमेलन म्हणजे आमच्या संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे.या संमेलनातून साहित्य सेवा करण्याची संधी दिली.साहित्यातून परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.आदिवासी संस्कृती या संमेलनातून अबाधित राहली पाहिजे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी संयोजक प्रा. मुसणे म्हणाले जिल्ह्यात साहित्यिकांची उणीव आहे. त्यामुळे साहित्यिकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हे संमेलन आयोजित करण्यात आले.नवीन कवींचा शोध या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून घेतला जाईल . व त्यांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात येईल.
या साहित्य संमेलनाचे संचालन प्रा डॉ.गणेश खुणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.रवी शास्त्रकार यांनी केले.
बॉक्स -- आज सकाळी ९.०० वाजता येथील आंबेडकर चौकातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. संमेलनाध्यक्ष प्रा . डॉ. विनायक तुमराम व पद्मश्री डॉ परशुराम खुणे यांनी ही ग्रंथ दिंडी खांद्यावर घेऊन आंबेडकर चौकातून सुरुवात केली. यावेळी बँड च्या तालावर आदिवासी व गोंडी नृत्य सादर करण्यात आले.नाचत नाचत ही ग्रंथ दिंडी महात्मा फुले महाविद्यालयापर्यंत नेण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थी विविध वेशभूषा परिधान करून आले होते. यावेळी स्वागताध्यक्ष बबलू भैय्या हकीम , सरपंच बेबी बुरांडे , शाहीन हकीम , प्राचार्य मकसूद शेख , माजी प्राचार्य लवली शेख , प्राचार्य संभाजी वारकर , प्राचार्य संजय फुलझेले , प्राचार्य लोनबले ,  प्रा.डॉ.राज मुसणे , प्रा डॉ रवी शास्त्रकार, राकेश बेलसरे , संजय पंदिलवार , प्राचार्य किशोर पाचभाई ,  प्राचार्य रविंद्र ठाकरे , प्राचार्य बेपारी, प्रा. रवी गजभिये आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !