आष्टी व परिसरातील अवैधरित्या दारू विक्री, सट्टा जुगार खुलेआम सुरू आहे यावर त्वरीत अंकुश घालावे — निवेदनाद्वारे आझाद समाज पार्टीने केली मागणी
पोलीस निरीक्षक विशाल काळे यांना दिले निवेदन
अशोक वासुदेव खंडारे / मुख्य
संपादक वैनगंगा वार्ता १९
आष्टी:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी व परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री, गावगुंडगिरी, जुगार, सट्टा आणि इतर अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. त्यावर अंकुश घालावे अशी मागणी आझाद समाज पार्टीचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे व पदाधिकारी यांनी पोलिस निरीक्षक विशाल काळे यांना निवेदन देऊन केली आहे
या अवैध धंद्यामुळे स्थानिक नागरिकांचे सामाजिक जीवनावर विपरीत परिणाम होत आहेत तसेच तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन त्याचे स्वास्थ बिघडत आहेत तथा बरेच कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत
या विरोधात अवैध दारू विक्री व धंदे करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी घेऊन आजाद समाज पार्टी युवा आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले.
सदर प्रकारांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, कुटुंबात रोज वाद होत आहेत. शाळकरी मुलांवरही याचा विपरीत परिणाम होतांना दिसुन येते आहे. सार्वजनिक शांतता भंग होत आहे व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे.
काय आहेत आजाद समाज पार्टी युवा आघाडीच्या मागण्या:-
1. आष्टी परिसरातील सर्व अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.
2. जुगार, सट्टा व अन्य अवैध धंदे करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत.
3. पोलिसांचे गस्त वाढवण्यात यावे.
4. महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक तयार करण्यात यावे.
5. ग्रामस्थांच्या सहकार्याने अवैध धंद्यांविरोधात जनजागृती अभियान राबवण्यात यावे.
जर प्रशासनाने या बाबीकडे दुर्लक्ष केले, तर ग्रामस्थ व आजाद समाज पार्टी युवा आघाडीला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.
आपण या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करावी असे निवेदन सादर करण्यात आले. निवेदन देते वेळी आझाद समाज पार्टीचे युवा आघाडी अध्यक्ष विवेक खोब्रागडे, सचिव प्रकाश बनसोड,नाशिकांत भसारकर बाळू चांदेकर, अश्वीन निमरड सुगत कुकुडकर हरिदेव शेडमाके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

