खासगी ईसमाचे माध्यमातून लाच घेतल्याने वनाधिकारी व वनरक्षक यांचे विरुद्ध गुन्हा दाखल

0

खासगी ईसमाचे माध्यमातून लाच घेतल्याने वनाधिकारी व वनरक्षक यांचे विरुद्ध गुन्हा दाखल 



मुलचेरा : मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्राच्या वनअधिकाऱ्यासह एका वनरक्षाकाने एका खासगी ईसमाचे माध्यमातून फर्निचर व्यावसायिकाकडून 50 हजार रुपयांची लाच घेतल्याचा ठपका ठेवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यासह प्रत्यक्ष लाच स्वीकारलेल्या खासगी इसमावर कायदेशिर कारवाई करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे 

एसीबीच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, वनविभागाच्या लाकडाचा विनापरवानगी वापर केल्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी एका फर्निचर व्यावसायिकाकडून आरएफओ श्रीनिवास कटकू, वनरक्षक नितेश मडावी आणि खाजगी डसम प्रदीप मंडल यांनी 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार संबंधित फर्निचर व्यावसायिकाने केली होती. त्यानुसार गडचिरोलीतील एसीबीच्या पथकाने सतत तीन दिवस सापळा रचला मात्र काल दि १९ जून ला 3 लाखांच्या लाचेतील पहिला हप्ता 50 हजार रुपये स्वीकारताना खासगी इसम प्रदीप मंडल याला रंगेहाथ पकडण्यात आले.

या प्रकरणात आरएफओ कटकू किंवा वनरक्षक मडावी यांचा कितपत सहभाग आहे याचा तपास केला जात आहे. विशेष म्हणजे दुपारी ही कारवाई झाली असली तरी एसीबीचे पथक रात्रीपर्यंत मुलचेरा येथे या प्रकरणात कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करण्यात व्यस्त होते.
यापुर्वीही वनपरिक्षेत्र अधिकारी कटकू भ्रष्टाचारचे आरोपात निलंबित झाले आहेत हे मात्र विषेश
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !