डॉक्टर सरकारने लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे केले लैंगिक शोषण
आष्टीतील बिजेन सरकार डॉक्टरविरुद्ध गडचिरोली येथे गुन्हा दाखल" न्यायालयीन कोठडीत रवानगी
आष्टी (अशोक खंडारे/वैनगंगा वार्ता १९)
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील एका डॉक्टरविरुद्ध तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरने संबंधित तरुणीशी विवाह करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाच्या आधारावर त्याने तिच्याशी वारंवार संबंध ठेवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र नंतर लग्न करण्यास नकार दिल्याने पीडित तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीच्या आधारे गडचिरोली पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टर बिजन प्रधान सरकार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच ही दुसरी गंभीर घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पोलीसांनी त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
सदर डॉ बिजन सरकार तीन वर्षांपासून आष्टी येथे नमीता हॉस्पिटल नावाने दवाखाना चालवीत होते बिजन सरकार हे मुळचे पुष्पनगर जि.गोंदिया येथील असून त्याच्याच दवाखान्यात व इतरत्र पिडीतेचे लैंगिक शोषण केले अश्या विकृत प्रवृत्तीच्या व डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या डॉक्टर ला
एका पिडीत तरुणीने चांगलाच धडा शिकवला आहे

