उपवर्गीकरण विरोधी महामोर्चात बहुसंख्येने सहभागी होणार; गडचिरोली येथील आंबेडकरी कार्यकर्त्यांचा निर्धार

0
उपवर्गीकरण विरोधी महामोर्चात बहुसंख्येने सहभागी होणार; गडचिरोली येथील आंबेडकरी कार्यकर्त्यांचा निर्धार


गडचिरोली (अशोक खंडारे)-- आरक्षण उपवर्गीकरण बचाव कृती समितीच्या वतीने नागपूर  येथील पवित्र दीक्षाभूमी वरून दिनांक २० जून रोजी काढण्यात येणाऱ्या महामोर्चात गडचिरोली जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा संकल्प येथील आंबेडकरी संगठनांनी जाहीर केला आहे. 
शनिवारी येथील विविध आंबेडकरी सामाजिक, राजकीय संघटनांच्या संयुक्त सभेत हा निर्णय घेण्यात आला. ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रोहिदास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत कृती समितीचे नागपूर येथील ज्येष्ठ पदाधिकारी प्रीतम बुलकुंडे, एड.  स्मिता कांबळे, बिआरएसपी चे जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोडे भारतीय बौद्ध महासभेचे तुलाराम राऊत, प्रा. गौतम डांगे प्रामुख्याने उपस्थित होते. 
महाराष्ट्र सरकार द्वारे प्रस्तावित असलेले अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण हे असंवैधानिक, अन्यायपूर्ण व जाती जातीत तेढ निर्माण करणारे, घटनादत्त आरक्षण समाप्त करणारे असल्याचे  बुलकुंडे यांनी सांगितले. हे उपवर्गीकरण आम्हाला मान्य  नसून ते त्वरित थांबविण्यात यावे या मागणीसाठी  महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
   एड. कांबळे यांनी सुद्धा सभेला मार्गदर्शन केले व अनुसूचित जातीचे आरक्षण संपवण्याच्या षडयंत्रातून उपवर्गीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे सांगितले. या अन्याय विरुद्ध संपूर्ण आंबेडकरी समाजाने एकत्र येऊन त्याचा विरोध करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
या महामोर्चात सर्व आंबेडकरी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन रोहिदास राऊत यांनी यावेळी केले. प्रा. प्रकाश दुधे यांनी सभेचे प्रास्ताविक, अनिल बारसागडे यांनी संचालन आणि हंसराज उंदीरवाडे यांनी आभार प्रदर्शन केले. 
सभेला बाबा घुटके, गुलाब बांबोडे, प्रदीप भैसारे, विवेक बारसिंगे , संघरक्षीत फुलझेले, प्रेमेंद्र सहारे, तुळशीदास सहारे, रमेश डोंगरे, मालाताई  भजगवळी, सुमित्रा राऊत, मनीषा वारके, भारत जांभुळकर, सिद्धार्थ खोब्रागडे,  गिरीश मुंजमकर यांचेसह आंबेडकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !