महीला पोलीस यांची त्यांच्या निवासस्थानी केली हत्या, संशयावरुन पतीस केली पोलीसांनी अटक

0
महीला पोलीस यांची त्यांच्या निवासस्थानी केली हत्या, संशयावरुन पतीस केली पोलीसांनी अटक


अमरावती :- एका महीला पोलीस यांची त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आली आहे दिनांक १ ऑगस्ट रोजी शहरात एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण पोलीस विभागात आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या वडाळी परिसरातील गुरुकृपा कॉलनी येथे शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजताचे सुमारास महिला पोलीस कॉन्स्टेबल आशा राहुल घुले (तायडे) वय ३२ वर्षं हिची तिच्याच घरात गळा चिरून हत्या करण्यात आली. आशा ह्या फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.
त्या दिवशी आशा तायडे या आजारी असल्याने घरी एकट्याच होत्या. त्यांचे पती एसआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल आहेत ते त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीला शिकवणीला सोडण्यासाठी बाहेर गेले होते यावेळी त्यांच्या १३ वर्षांच्या मुलगा (शौर्य) हा शाळेतून परतल्यानंतर त्याने दोन मुखवटेधारी पुरुषांना घरातून पळून जाताना पाहिले. घरात प्रवेश केल्यानंतर त्याला जन्मदाती रक्ताने माखलेल्या अवस्थेत बेशुद्ध पडलेली दिसली. घाबरलेल्या शौर्यने त्वरित वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भाडेकरूकडे धाव घेतली आणि वडिलांना मोबाईलवरून माहिती दिली.
शौर्यने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघे हल्लेखोरांनी आशा हिची गळा कापून हत्या केली आहे ही घटना घडली तेव्हा वरच्या मजल्यावर सहा भाडेकरू राहत असून, कोणालाही ओरडण्याचा आवाज ऐकू आला नाही 
मृत आशा तायडे यांच्या मोठ्या बहिणीने फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आशा आणि तिच्या पती राहुल तायडे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते. याआधी देखील फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात त्यांच्या वादावरून एनसी नोंदविण्यात आली होती. तसेच, आशा यांनी ८-९ दिवसांसाठी रजेची मागणी केली होती. रजे दरम्यान ती घरीच होती 
शौर्यने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोघा हल्लेखोरांनी तोंडावर दुपट्टा बांधला होता. त्यांनी आशाचा गळा निर्दयपणे कापून हत्या केली. विशेष म्हणजे, ही घटना घडली तेव्हा वरच्या मजल्यावर सहा भाडेकरू राहत असून, कोणालाही आवाज किंवा हालचाल जाणवली नव्हती.
मृत आशा तायडे यांच्या यांच्या मोठ्या बहिणीने फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, आशा आणि तिच्या पती राहुल तायडे यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरू होते. याआधी देखील फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली आहे 
या घटनेमुळे तायडे आणि घुले कुटुंबात दुःखाचे सावट पसरले आहे. मृत आशा यांच्या मागे १३ वर्षांचा मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी आहे. पोलिसांनी या प्रकरणी विविध कोनातून तपास सुरू केला असून, घरातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल्स व परिसरातील साक्षीदारांचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे.
दिवसाढवळ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याची तिच्याच घरी निघृण हत्या झाल्यामुळे संपूर्ण अमरावतीत खळबळ माजली आहे. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पोलीस वसाहतीत घडलेली ही घटना अनेक शंकाकुशंका  निर्माण होत आहेत त्यामुळे पोलिसांपुढे ह्या गुन्ह्याचा नेमका आरोपी कोन ?  हे शोधून काढने
मोठे आव्हान ठरले आहे 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !