कोनसरी येथे अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकने काळीपिवळी सुमोला दिली समोरासमोर धडक, चार इसम गंभीर जखमी
चार इसम गंभीर जखमी,
सुदैवाने जीवितहानी टळली
आष्टी - अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकची काळी पिवळी सुमोला समोरासमोर धडक बसुन चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना दिनांक दोन ऑगस्ट शनिवारी दीड वाजताचे सुमारास गडचिरोली चामोर्शी मार्गावरील कोनसरी येथे घडली.
रामगोपाल सुदाम खवास वय 53 वर्ष रा. ताडगाव प्रशांत राजकुमार मेश्राम वय 37 वर्ष काळी पिवळी चालक रा. चामोर्शी, कविता किशोर सोनटक्के वय 58 वर्ष रा.गडचिरोली मारोती गणपती पुज्जलवार वय 70 वर्ष रा. रामसागर असे जखमीचे नावे आहेत
काळी पिवळी सुमो क्रमांक MH 33 A-394 ही आष्टी वरून प्रवासी घेवुन चामोर्शी कडे जात असताना कोनसरी बस स्टॉप नजिक विरुद्ध दिशेने अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रक क्र .MH40 CM8391 ने समोरा समोर जबर धडक दिली यात काळी पिवळी सुमो मधील चालकासह चार प्रवासी जखमी झाले. जखमींना त्वरीत आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे ट्रक चालकाला पोलीसांनी अटक केली असुन त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहेत

