इटियाडोह धरणाचे विहंगम दृश्य बघायला आलेल्या चिमुकल्या पर्यटकावर बिबट्याचा हल्ला
चार वर्षाचा चिमुकला विहान रॉय गंभीर जखमी
अर्जुनी (मोरगाव) :-
इटियाडोह धरणातून विसर्ग झाल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने धरणातील विहंगम दृश्य बघण्याकरिता येत आहेत. अशातच आज दि.३० ऑगस्ट सायंकाळी ५.३० वाजताचे दरम्यान आपल्या नातलगासह आलेल्या एका चिमुकल्या पर्यटकावर वन्य प्राणी बिबट्याने हल्ला करत जवळपास १०० फुट जंगल परिसरात ओढत नेले. मात्र सुदैवाने उपस्थित पर्यटकांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना होण्यापासून रोखल्या गेली मात्र हल्ल्यात चिमुकला विहान भौतोष रॉय वय ४ वर्ष रा. दिनकरनगर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे
सविस्तर वृत्त असे कि, मागील अनेक दिवसापासून परिसरात वन्यप्राणी आणि मानव यांच्यातला संघर्ष वाढताना दिसत आहे या आधी सुद्धा लहान बालकाला बिबट्याने गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली होती. आज विहान आपल्या काका अजय सरदार वय २५ रा. दिनकरनगर यांच्या सोबत इटियाडोह धरण बघायला आला. धरण बघून परत जात असतांना ऐन गर्दीचे ठिकाण
असलेल्या विश्रामगृहा जवळील परतीच्या रस्त्यावर काकाच्या हातात आपली करंगळी पकडून चालत असतांना दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट हल्ला चढवत पायाला पकडून ओढत नेले. लगेच सोबत असलेले नातलग अजय सरदार यांनी बिबट्याला परतून लावण्याचा पहिला प्रयत्न केला मात्र पुन्हा बिबट्याने थेट विहानच्या गळ्याला पकडून जवळपास १०० फुट जंगल परिसरात ओढत नेले दरम्यान अनेक पर्यटकांनी आरडा ओरड केली त्यामुळे हल्लेखोर हिंस्त्र प्राणी बिबट्याला परतून लावण्यात यश मिळवले.
या हल्यात चिमुकला विहान गंभीर जखमी झाला गळ्याला गंभीर दुखापत झाली मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे दाखल केले तिथे प्राथमिक उपचार करून गंगाबाई जिल्हा रुग्णालय गोंदिया इथे हलविण्यात आले आहे. त्या ठिकाणी व्यवसाय असलेली पूजा पचारे ,तेजराम पराते यांनी मदत केली
याच परिसरात हिंस्त्र प्राण्यांची मोठी दहशत निर्माण झाली असल्याने पर्यटकांनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे चित्र दिसून येत आहे

