एकतर्फी प्रेमातून प्रेमवीराने दहावीच्या विद्यार्थिनीवर चाकूने सपासप वार करुण केले ठार
नागपूर : येथील एका नामांकित शाळेतील दहाव्या वर्गातील विद्यार्थीनी शाळा सुटून घराकडे परतीच्या वाटेवर असताना एकाअल्पवयीन मुलाने चक्क रस्त्यावरच चाकुने सपासप वार करुण ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुलमोहर कॉलनी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागपूर हादरलं असून, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
मृत मुलगी दहाव्या वर्गात शिक्षण घेत होती. शाळा सुटल्यानंतर ती घरी जात असताना अजनी पोलीस स्टेशन हद्दीत एका अल्पवयीन आरोपीने तिची वाट अडवली. अचानक आरोपीने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत ती घटनास्थळीच कोसळली आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. सदर बाबतीत एकतर्फी प्रेमातून हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत

