आष्टी येथे वज्राघाताने चार मेंढ्या ठार

0

आष्टी येथे वज्राघाताने चार मेंढ्या ठार 


आष्टी (अशोक खंडारे):- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे वज्राघाताने चार मेंढ्या ठार झाल्याची घटना काल दि २८ जून ला सायंकाळी सहा वाजताचे सुमारास घडली 
काल सायंकाळी पाच ते सहा वाजताचे दरम्यान आष्टी येथे वादळवारा विजांचा गडगडाट सह पावसाने झोडपले तळोधी येथील मेंढपाळ किशोर पोचू कांकडलवार हे आष्टी -नोकेवाडा जूनघरे यांच्या शेतशिवारात मेंढ्यांच्या कळपासह होते अचानक सहा वाजता चे सुमारास वज्राघात झाला व चार मेंढ्या जागीच ठार झाल्या तेव्हा मेंढपाळाने तहसीलदार चामोर्शी यांना माहिती दिली त्यावरुन दि २९ जूनला ग्राम महसूल अधिकारी एम टी पोरतेट यांनी पंचनामा करुन मृत पावलेल्या मेंढ्याचा शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करण्यात जागीच शवविच्छेदन केले मेंढपाळाची ५५ हजार रुपये नुकसानभरपाई झाल्याचे नमुद केले आता शासनाकडून नुकसान भरपाई केव्हा मिळणार याची वाट मेंढपाळ बघत आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !