बामणपेठजवळ पतीने पत्नीवर केले चाकूने सपासप वार; पत्नी गंभीर जखमी, परिसरात खळबळ
आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील घटना; प्राथमिक उपचारानंतर महिलेला पुढील उपचारासाठी रेफर, हल्ल्यामागील कारणाचा तपास सुरू
आष्टी, दि. 28 (अशोक खंडारे) :
चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बामणपेठ गावाजवळ आज (दि. 28 जून) सकाळी १० वाजताचे सुमारास पतीने पत्नीवर चाकुने सपासप वार करून गंभीर जखमी केले
या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी महिलेचे नाव कनिका ब्रजकेश दास उर्फ कनिका विश्वजीत मंडल वय २८ वर्षे रा.विकासपल्ली हल्ली मुक्काम ठाकुरनगर ता.चामोर्शी जिल्हा गडचिरोली असून तिला तातडीने आष्टी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, लगाम वरुन कनिका हिचा आतेभाऊ हरीदास अमल गाईन व मुलगा आयुष दास हे ठाकुरनगर कडे दुचाकीने जात असताना आरोपी ब्रजकेश दास वय २८ याने बामनपेठ जंगल रोडवर दुचाकीला मी धक्का देऊन त्यांना खाली पाडले व अश्लील शिविगाळ करुन जीवे मारण्यासाठी धारदार शस्त्राने कनिका हिचे दोन्ही पायावर,हातावर, पोटावर, आणि मानेवर सपासप वार केले व पळून गेला गंभीर जखमी कनिकाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले
हल्ला झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, पतीने पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे केला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आष्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून हल्ल्यामागील नेमके कारण पोलीस चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे.
गुन्ह्राचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे या़च्या मार्गदर्शनाखाली सपोनी मदन म्हस्के करीत आहेत

