३० जून च्या मुंबई महामोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हा ; उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीचे आवाहन

0
३० जून च्या मुंबई महामोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हा ;
उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीचे आवाहन


गडचिरोली -- महाराष्ट्र सरकारने प्रस्तावित केलेल्या आरक्षण उपवर्गीकरण विरोधात दिनांक ३० जून २०२६ रोजी उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मुंबई येथी विधान भवनावर भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे.
   राज्यात भाजपा सरकार २०२४चा कोर्ट निकाल बंधनकारक नसताना सोईच्या राजकारणा साठी उपवर्गीकरण करू पाहत आहे, ज्याला अजूनही कॅबिनेट मान्यता नाही. याचा विरोध धरणे, प्रदर्शन, मोर्चे आंदोलने, लॉंगमार्च, परिषदाद्वारे मोठ्या प्रमाणावर होत आहे.
    याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील समस्त फुले-शाहू-आंबेडकरी जनतेच्या वतीने ३० जून २०२६ रोजी मुंबईत विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
    ३० जूनचा विराट महामोर्चा हा कोणत्याही जात-समूह विरोधात नसून राज्यातील भाजपा-सेना-राष्ट्रवादी सरकार विरोधात आहे. संवैधानिक अधिकार-आरक्षण व सर्वांच्या एकतेसाठी असून उपवर्गीकरण हा उपाय नसून आणखीन एक भयंकर रोग आहे असे आम्ही ठामपणे मानतो.
    उपवर्गीकरणाशिवाय सरकारांनी अन्य पर्यायाचा विचार करणे आवश्यक आहे जो भाजपा सरकारने मराठा-धनगर समाजाबाबत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आरक्षण नाकारल्यानंतरही केलेला आहे. मग दलित आदिवासी समुदायाबाबतच सरकारचे शहाणपण का संपते हा सरकारला सवाल आहे. 
     आपण सर्वांनी हजारोंच्या संख्येने आपआपल्या पक्ष-संघटनांचे झेंडे-बॅनर्स, घेऊन मोर्चात बहुसंख्येने सामील होण्याचे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने हंसराज उंदीरवाडे, प्रल्हाद रायपुरे, मिलिंद बांबोडे, हंसराज बडोले, राजेंद्र बांबोडे, तुलाराम राऊत प्रा. गौतम डांगे आदींनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !