आष्टी येथील पंदीलवार कुटुंबीयांची महालक्ष्मी पूजेची परंपरा कायम
सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांच्या राहते घरी घटस्थापना व महाप्रसाद उद्या
आष्टी : माजी जि.प. सदस्य रुपाली पंदीलवार व सामाजिक कार्यकर्ते कंत्राटदार संजय पंदीलवार यांच्या चैतन्य निवास येथे गेल्या दहा वर्षांपासून दरवर्षी महालक्ष्मी देवीची स्थापना करून मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चना करून सामाजिक बांधिलकी जोपासत महालक्ष्मी पुजेची परंपरा कायम राखली आहे. यानिमित्त सोमवार १ सप्टेंबर रोजी घटस्थापना व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात
येणार आहे.
महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील हजारो सुहासिनी सहकुटुंब उपस्थित राहून ओटी भरून प्रार्थनेसाठी दिवसभर रांगेत उभ्या राहतात. सोमवार १ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेदरम्यान, घटस्थापना, आरती तसेच दर्शन, विधिवत महालक्ष्मीचे दर्शन घेता येणार आहे. सायंकाळी ५ वाजतापासून महाप्रसादाचे वितरण सुरू होणार आहे. परिसरातील अनेक गावांतील हजारो भाविक, बंधू, भगीनी व कार्यकर्ते महाप्रसादाचा लाभ घेतात. दिवसभर पंदीलवार यांच्या निवासस्थानी भाविकांची गर्दी उसळत असून धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. यामुळे समता, बंधूत्व, एकोपा व सर्वधर्म समभाव आदी दर्शन घडत असून पंदीलवार कुटुंब महालक्ष्मी पूजेतून निर्माण करतात सामाजिक कार्यकर्ते संजय पंदीलवार, जि.प. माजी सदस्य रुपाली पंदीलवार, अमोल पंदीलवार, प्रफुल पंदीलवार, दीपक पंदीलवार, मधुकर पंदीलवार, आयुष पंदीलवार आदींसह नातेवाईक मित्रपरिवार भाविकांच्या योग्य व्यवस्थेसाठी सहकार्य करीत आहेत.

