नंदिग्राम एक्स्प्रेस रेल्वे क्र.११००१ मधील शौचालयात एका प्रवाशाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाले शव - बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ

0
नंदिग्राम एक्स्प्रेस रेल्वे क्र.११००१ मधील शौचालयात एका प्रवाशाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळाले शव - बल्लारपूर रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ


बल्लारपूर :- 
मुंबई वरुन येणारी नंदिग्राम एक्स्प्रेस रेल्वे क्र.११००१ मधील सौचालयात एका प्रवाशाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत शव मिळाल्याने बल्लारपूर रेल्वे स्थानकात एकच खळबळ उडाल्याची घटना आज दि.३० ऑगस्टला दुपारी एक ते १.३० वाजताचे सुमारास धक्कादायक घटना उघडकीस आली.
सुमारे दुपारी १.२० वाजता नंदीग्राम एक्स्प्रेस बल्लारपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ०५ वर पोहचली. गाडीची नेहमीप्रमाणे सी. अँड. डब्ल्यू. विभागा मार्फत अंतर्गत तपासणी सुरू असताना कोच क्रमांक एस-३ मधील उजव्या बाजूचे शौचालय आतून बंद असल्याचे आढळले. तेव्हा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दार उघडले नाही. त्यानंतर ही माहिती तात्काळ स्टेशन प्रबंधक बल्लारपूर यांना देण्यात आली. रेल्वे प्रशासनाने तत्काळ दार उघडून पाहिले असता, आत एका प्रवाशाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
 घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृत प्रवाशाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे काही वेळासाठी रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली होती.
अधीकचा तपास रेल्वे पोलिस व प्रशासन करीत आहेत

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !